भारत विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

भारत विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

दिनांक 15 ऑगस्ट 2024:

आज भारत विद्यालय हिंगणघाट येथे 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. राजूजी कारवटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. बँड पथक आणि संगीत चमुच्या साथीने राष्ट्रगीत,राज्य गीत, जयघोष आणि झंडा गीत यांच्या गायनानंतर मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंचावर शाळेचे उपमुख्याध्यापक मा. श्री. हरीशजी भट्टड, पर्यवेक्षक श्री विनोदजी नांदुरकर, पर्यवेक्षिका निलाक्षीताई बुरीले, एनसीसी कमांडर श्री. किशोरजी चवरे आणि भारत प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती देवगिरकर उपस्थित होत्या.
अध्यक्षीय संबोधन करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री राजूजी कारवटकर यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात थोर पुरुषांचे तसेच क्रांतिकारकांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या त्यागाची, बलिदानाची, समर्पणाची जाणीव आपण सर्वांनी ठेवून राष्ट्राचा विकास कसा साध्य करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले याची पार्श्वभूमी समजावून सांगितली आणि उपस्थित सर्वांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तिरंगा प्रतिज्ञा तसेच तंबाखूमुक्त अभियानाअंतर्गत व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्री. मिलिंद सावरकर यांनी केले.
या कार्यक्रमाला एनसीसी पथक, स्काऊट गाईड पथक, मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक वर्ग तसेच गावातील नागरिक शाळेतील समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Add Comment