भारत विद्यालयाची वाटचाल...
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानगंगा पोहयविण्यासाठी विद्यालयात सहशालेय उपक्रमांचे आयोजन नित्यनेमाने केले जाते. बालसंगम कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण विद्यार्थ्यांना शरीर संवर्धनाचे धडे सूर्यनमस्कार व योगासनाच्या माध्यमातून दिले जातात. आपल्या प्राचिन संस्कृतीचे जतन करणे व विद्यार्थ्यांना प्राचिन संस्कृतीची ओळख करुण देण्यासाठी विद्याभारती द्वारे आयोजित संस्कृती ज्ञान परीक्षेला विद्यालयातील शंभर टक्के विद्यार्थी सहभाग घेतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या प्राचिन संस्कृतीची ओळख तर होतेच, शिवाय दैनंदिन जीवनात शिस्त व संस्कार याचा योग्य मेळ साधला जातो पर्यावरण संवर्धनाचे महत्व समजून घेण्यासाठी हिंगणघाट नगरातील वणा नदीच्या स्वच्छतेसाठी विद्यालयातील NCC व स्काउट गाईडचे विद्यार्थी हिरीरीने सहभागी होतात. पर्यावरणावर आधारित चित्रकला, रांगोळी स्पर्धेतून सुद्धा विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेवून प्राविण्य प्राप्त करतात. विद्यालयाचे अनेक विद्यार्थी शालेय स्तरावर किडा, संगीत, कला, व विज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी होवून राष्ट्रीय व राज्यस्तरावर विद्यालयाचे प्रतिनिधित्व करतात व प्रत्येक स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करतात. विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून प्रत्येक वर्षी विद्यालयात वार्षिक सेहसंम्मेलनाचे आयोजन केले जाते ज्यात गीत, संगीत-नाटक, भाषण कौशल्य, काव्य, विविध खेळामध्ये विद्यार्थी सहभागी होऊन आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांचा अविष्कार करतात. विद्यार्थ्यांच्या सर्वागिन विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात केले जाते. ज्यामध्ये समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाते अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनिय मोहनजी भागवत, देशाचे परीवहण मंत्री श्रीमान नितीनजी गडकरी आदी मान्यवरांचे विविध कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन उपलब्ध करून घेण्यात आले.
समाजातील बांधिलकीची जाणीव ठेवून विद्यार्थी ग्राम स्वच्छता अभियान, योग दिन, वाचन प्रेरणा दिन, अखंड भारत दिन, वसंत पंचमी अशा विविध उपक्रमात सहभागी होतात.
विद्यालयाला अनेक नामवंत आणि कर्तृत्ववान मुख्याध्यापकांची परंपरा लाभली आहे. स्व. वि. कृ. देशपांडे, स्व.म.रा. सिंगरू, स्व.म.श. इंदुरकर, स्व.श.म. कोपाळ इत्यादी सह व त्यानंतर इतरही मुख्याध्यापक झालेत. थापेकी श्री. ब.रा. चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. समाजातील भरीव योगदानासाठी विद्यालयाला नुकतेच इंडियन टॉलेन्ट सर्च संस्था उदगिर व्दारा लातुर येथे महाराष्ट्र राज्य युवा कल्याण व क्रिडा मंत्री श्रीमान संजय बनसोडे व मराठवाड्यातील शिक्षक आमदार श्रीमान विक्रमजी काळे यांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान राजू तानबाजी कारवटकर पांना दि. 01 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेचे आणि विद्यालयाचे मुख्य ध्येय शिक्षणाची गंगा आपली प्राचिन परंपरा, आपले प्राचिन संस्कार, प्राचिन जान तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे हाच असून यासाठी संस्था अध्यक्ष मा. श्री. गोकुलदासजी राठी, सचिव मा. श्री. रमेशराव धारकर संपूर्ण संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री राजू तानबाजी कारवटकर यांचे मार्गदर्शनात विद्यालयाचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी बंद अविरत प्रयत्न करीत आहे.
Gallery
Contact Us
GRWP+MX2, Shivaji Ward, Hinganghat,