कृतिका तराळेची राष्ट्रीय अष्टेडू आखाडा स्पर्धेकरिता निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा ,भंडारा जिल्हा अस्तेडू आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन मर्दानी खेळ राज्यस्तरीय शालेय अष्टेडू आखाडा स्पर्धा दिनांक 4 व 5 मार्च 2025 ला पवनी येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत भारत विद्यालय हिंगणघाट येथील कु. कृतिका किशोर तराळे वर्ग 9 वा (ड)ही विद्यार्थिनी हस्तकला या प्रकारात सहभागी झाली होती तिने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले व तिची निवड राष्ट्रीय अस्टेडू आखाडा स्पर्धेकरिता झाली मिळालेल्या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी हिंगणघाट चे अध्यक्ष श्री गोकुलदासजी राठी उपाध्यक्ष श्यामभाऊ भीमनवार सचिव श्री रमेशजी धारकर शाळेचे मुख्याध्यापक हरीशजी भट्टड उपमुख्याध्यापक किशोरजी चवरे पर्यवेक्षिका सौ.बुरीले मॅडम कु. मनीषा कोंडावार मॅडम क्रीडा विभाग प्रमुख विनोद कोसुरकर क्रीडा शिक्षक संदीप चांभारे तसेच या विद्यार्थिनीला प्रशिक्षण देणारी क्रीडा शिक्षिका संजना चौधरी व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या मिळालेल्या यशाबद्दल या विद्यार्थिनीचे कौतुक केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धे करीता शुभेच्छा दिल्या 🥇🥇💐💐

Add Comment